फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार नागपूर इथे समोर आलेला असून कामाच्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर आरोपी व्यक्तीने फिर्यादी हिला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर तब्बल आठ महिने अत्याचार केले आणि पळून गेला. आरोपीने त्यानंतर लग्नाला नकार दिलेला असून हतबल झालेली तरुणी ही अखेर पोलिसात पोहोचलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमन शिवकुमार शर्मा ( वय वीस वर्ष राहणार कृष्णा नगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची एका वीस वर्षीय तरुणी सोबत कामाच्या निमित्ताने ओळख झालेली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर अमित याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
‘ मी तुझ्यासोबत लग्न करेल ‘ असे म्हणत आरोपी सतत तिला लग्नाची गळ घालत होता त्यानंतर त्याने आपण लग्न करणारच आहोत असे म्हणत फेब्रुवारी 2023 पासून तिच्यावर अत्याचार करण्यास देखील सुरू केले. सातत्याने हा प्रकार घडला आणि अखेर आठ महिन्यानंतर आरोपी पळून गेलेला आहे . गिट्टीखदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.