स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असताना देखील सायबर भामट्यांनी एका महिलेला पुण्यात तब्बल 36 लाख 47 हजार रुपयांना गंडा घातलेला असून विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने याप्रकरणी सायबर पोलिसात दिलेली आहे . इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि चांगले पैसे कमवा अशा आमिषाला ही महिला बळी पडलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअपवर मेसेज आला त्यामध्ये पार्ट टाइम नोकरीसाठी तुम्ही इच्छुक आहात का ? असे विचारण्यात आले होते. महिलेने त्यामध्ये स्वारस्य दाखवल्यानंतर आरोपींनी त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून घेतले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्यानंतर किरकोळ रक्कम देखील महिलेला देण्यात आली मात्र त्यानंतर आणखीन काम हवे असेल तर तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल अशा स्वरूपात वेळोवेळी करत त्यांच्याकडून तब्बल 36 लाख 47 हजार रुपये आरोपींनी देण्यास पाडले असे फिर्यादींचे म्हणणे आहे.