महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून सिंगापूर इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळवण्याच्या एका वेबसाईटवरून मुंबईत राहणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेसोबत मैत्री केली आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. तक्रारदार महिलेने अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी व्यक्ती हा परदेशी नागरिक असून घटनेतील पीडित महिला ही नवी मुंबईत रहायला आहे . मार्च 2020 मध्ये तिची लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटवरून सिंगापूर येथील एका व्यक्तीसोबत ओळख झालेली होती . आरोपीने त्यानंतर तिला स्वतःचा संपर्क नंबर दिला आणि त्यानंतर ते एकमेकांसोबत संपर्कात राहायला लागले.
काही दिवस उलटल्यानंतर आरोपी भारतात आला त्यावेळी महिलेने त्याची भेट घेतली आणि त्यांनी नवी मुंबई आणि त्यानंतर सिंगापूर इथे जाऊन देखील शारीरिक संबंध ठेवले . दरम्यानच्या काळात आरोपीने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 376 दोन एन अंतर्गत गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे .