संयमाचा बांध रुग्णालयातच तुटला , पतीला काळे फासत सासरच्यांना बडवलं

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार कल्याणमध्ये समोर आलेला असून अल्पवयीन मुलीचे पळवून नेवून लग्न लावून दिले त्यानंतर लग्नानंतर तिचा मृत्यू झाला म्हणून संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलीच्या पतीच्या तोंडाला काळे फासून त्याच्या कुटुंबीयांना बेदम चोप दिलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील ही घटना असून टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे . पुणे येथील निगडी परिसरात राहणारे राजेंद्र रणदिवे यांची अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली होती त्यानंतर रोहन मस्के याच्यासोबत तिचे लग्न रोहन याच्या नातेवाईकांनी लावून दिले .

एकीकडे मुलीला पळविण्यात आले तर दुसरीकडे परस्पर तिचे लग्न देखील लावून देण्यात आले त्यानंतर तिच्यावर बलात्कारही करण्यात आला असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलेला होता. लग्न लागल्यावर काही दिवसातच मुलीने घरी फोन करून मला हे पैशासाठी ब्लॅकमेल करत आहेत असे सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमच्या मुलीने फाशी घेतलेली आहे असा फोन मुलीच्या कुटुंबीयांना करण्यात आला

सोमवारी मुलीचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात आणण्यात आला त्यावेळी राजेंद्र रणदिवे कुटुंबीयांसोबत तिथे पोहोचलेले होते . रोहन मस्के , त्याची बहीण नेहा जाधव आणि इतर नातेवाईकांना रुग्णालयात पाहताच मुलीच्या नातेवाईकांचा पारा चढला आणि त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना बेदम चोप दिला . मुलगी अल्पवयीन होती त्यात लग्न लावून दिले आणि बलात्कारही करण्यात आला आणि मृत्यूही झाला , हे सर्व अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर चकोर यांनी सांगितलेले आहे.


Spread the love