बायकोच्या आहारी गेलेला भाऊ नातं विसरला , बहीण गेल्यावर सत्य समोर आलं

Spread the love

एका अत्यंत खळबळजनक आणि गुंतागुंतीच्या खून प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलेले असून सख्या भावाने स्वतःच्या बहिणीचा खून केलेला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत इथे एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , मयत महिलेचे नाव मनीषा असे असून ती मूळची सैदापूर गावची रहिवासी होती. तिचा भाऊ आणि वहिनी यांनी तिची हत्या केल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. कोट्यवधीचे मृत्युपत्र हडप करण्याच्या लोभापोटी हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मनीषा हिची वहिनी शिखा हिचे गेल्या अनेक वर्षांपासून पवन नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते . मनीषाचा भाऊ असलेला मनीष याला याप्रकरणी कल्पना देखील नव्हती सुरुवातीला मनीषाने तिच्या वहिनीच्या अनैतिक संबंधाला विरोध केला मात्र वहिनीने ऐकले नाही म्हणून अखेर मनीषा हिने हा सर्व प्रकार शिखाच्या नवऱ्याला अर्थात मनीषला सांगण्याची धमकी दिलेली होती.

शिखा हिने त्यानंतर मनीषा हिलाच आपल्या रस्त्यातून बाजूला करण्याचा प्लॅन केला. धक्कादायक म्हणजे या प्लॅनमध्ये तिने मनीषाचा भाऊ मनीष याच्या मनात असे बिंबवले की तुमच्या बहिणीचा मृत्यू झाला तर सर्व संपत्ती आपल्याला मिळू शकते त्यामुळे पत्नीच्या बोलण्याला मनीष बळी पडला आणि सख्या बहिणीला मारायला तयार झाला त्यानंतर तिने आपला मित्र म्हणून तिचा प्रियकर पवन याला देखील या हत्याकांडात सहभागी करून घेतले.

तीनही आरोपींनी मिळून मनीषा हिचा खून केला आणि तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून बागपतच्या सीसाना गावात निर्जनस्थळी नेऊन पेटवण्याचा प्रयत्न केला. अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना मिळाला त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली त्यावेळी एक संशयास्पद कार आढळून आली आणि अखेर या आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.


Spread the love