शेवगावमध्ये परप्रांतीय क्रेनचालकाचे अपहरण , दोन जण ताब्यात

Spread the love

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना शेवगावमध्ये समोर आलेली होती . शेवगाव इथे एका परप्रांतीय क्रेनचालकाचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 12 लाख रुपयाचा क्रेन पळवून नेण्यात आला याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे . अटक केलेले दोनही आरोपी राहुरी तालुक्यातील आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , क्रेनचालक विजयकुमार प्रेमचंद प्रसाद असे अपहरण झालेल्या परप्रांतीय चालकाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे . नित्यसेवा हॉस्पिटल जवळील त्रिमूर्ती सर्व्हिस ऑफिस इथे तो झोपलेला असताना आरोपींनी त्याला उठवले आणि आमची कापसाची गाडी फसलेली आहे असे सांगत कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी त्यानंतर त्याला पैठण त्यानंतर खरवंडी , पाथर्डी आणि नगरला देखील आणले आणि मारहाण करत त्याच्या खिशातील 13 हजार रुपये हिसकावून घेतले तर इतर तीन जणांनी त्रिमूर्ती सर्व्हिस ऑफिस समोर लावलेले बारा लाख रुपयाचे क्रेन चोरून नेले अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती.

शेवगाव शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले त्यानंतर संदीप तुकाराम ठोकळे ( वय 31 ) , सागर सहदेव पवार ( वय 31 ) यांना राहुरी इथून ताब्यात घेण्यात आलेले आहे .


Spread the love