नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे कारागृहातून चार कैदी पळून गेलेले होते त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आले मात्र असाच एक प्रकार पुन्हा एकदा सांगली शहरात समोर आलेला असून जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने भिंतीवरून उडी मारून पलायन केलेले आहे . आठ तारखेला दुपारी ही घटना घडलेली आहे. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सदाशिव अशोक सनदे ( वय पंचवीस वर्षे राहणार मिसळवाडी आष्टा ) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची रवानगी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली होती.
बुधवारी दुपारी कारागृहातील स्वयंपाक खोलीत तो गेला आणि तिथे कोणीही नसल्याचे पाहून भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूलजवळून त्याने पलायन केले . काही वेळातच कारागृह प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली आणि दोन दिवसांपूर्वी त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला मात्र तो मिळून आला नाही त्यानंतर याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आलेली आहे.