‘ गोडबोले ‘ काका बनले तोतया नायब तहसीलदार , सहकारी महिलेसोबत अमेरिकन नागरिकाला..

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून नायब तहसीलदार असल्याचे भासवत मूळ कर्नाटक मधील रहिवासी असलेल्या मात्र सध्या अमेरिकेत राहायला असलेल्या एका व्यक्तीला तब्बल चार कोटी शंभर रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. सोलापूर पोलिसांनी त्यानंतर तोतया तहसीलदार आणि एका महिलेला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मनोज अश्रुबा गोडबोले ( वय 45 राहणार निखिल पार्क विजापूर रोड सोलापूर ) असे तोतया व्यक्ती याचे नाव असून 14 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे . त्याची सहकारी सानिका अभय उपाध्याय ( राहणार मंत्री चंडक पार्क विजापूर रोड ) हिलादेखील अटक करण्यात आलेली आहे.

बसवन्नाप्पा हदिमणी ( वय 55 राहणार किंग कार्डिंग रोड जॉर्जिया अमेरिका मूळ राहणार जुना जेऊर्गी रोड शास्त्रीनगर कलबुर्गी कर्नाटक ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे. सदर प्रकरणातील तोतया तहसीलदार मनोज गोडबोले याची पत्नी राधा गोडबोले , आदिती पांडुरंग गोसावी हे मात्र अद्यापपर्यंत फरार आहेत. गोडबोले यांचा मुलगा यश गोडबोले आणि बिभीषण लोंढे या दोन जणांना देखील अटक करण्यात आलेली होती मात्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे.


Spread the love