पुण्यात आईचा फोन मुलीने ‘ सहज ‘ घेतला अन , मुलीसोबत एकावर गुन्हा दाखल

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून विश्वासाने आईने मुलीला मोबाईल दिला मात्र मुलीने त्याचा गैरवापर करत स्वतःच्या मित्राला गुगल पे वरून 50 हजार रुपये पाठवले. हतबल झालेल्या आईने दहा तारखेला पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला या पिंपरी गावातील रहिवासी असून त्यांच्या मुलीसोबत निखिल डोंगरे ( वय १८ राहणार काळेवाडी पिंपरी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी महिला यांनी त्यांच्या अठरा वर्षाच्या मुलीला फोन करण्यासाठी म्हणून मोबाईल दिला मात्र तिने संशयित असलेला निखिल याच्या मदतीने त्या मोबाईलवरून फिर्यादी यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपये तिचा मित्र तेजस तुलसांकर याला गुगल पे केले. आपल्या खात्यातून पैसे वजा झाल्याचे समजताच फिर्यादी महिला यांनी मुलीला जाब विचारला मात्र तिच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून अखेर पोलिसात फिर्याद देण्यात आलेली आहे.


Spread the love