दिवाळी उत्सव सुरु असतानाच तरुणाचे टोकाचे पाऊल , कारण असे की..

Spread the love

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील यावल परिसरात ऐन दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून दारूच्या व्यसनामुळे व्यसन सुटत नसल्याने हतबल झालेल्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मयत तरुण हा अविवाहित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , डाम्बुर्णी गावातील हे प्रकरण असून किसन माणिक खंडारे ( वय 30 वर्ष राहणार डांबुर्णी तालुका यावल ) असे मयत तरुणाचे नाव असून बारा नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सणात संपूर्ण देश आनंदात असताना त्याने राहत्या घराच्या मागील बाजूला झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

आत्महत्या करणारा तरुण हा ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी यांच्या कुटुंबातील मुलगा होता मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याला दारूचे व्यसन लागलेले होते. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर प्रशांत जावळे आणि डॉक्टर मयूर चौधरी यांनी त्याची तपासणी केली त्यावेळी तो मयत असल्याचे लक्षात आले. पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


Spread the love