लातूर हादरलं..’ केस मागे घे ‘ म्हणत महिलेवर दोघांचा बलात्कार अन त्यानंतरही ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात समोर आलेली असून दोन आरोपींनी संगणमत करून एका 33 वर्षीय महिलेवर बळजबरीने अनेकदा बलात्कार केला आणि तिच्या मुलीला मोटरसायकलवर बळजबरीने बसवत तिची छेड काढली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो काढून व्हायरल करण्याची देखील धमकी दिली. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन जणांवर पॉक्सोसोबत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जहांगीर कुरेशी आणि अजीम कुरेशी अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. फिर्यादी 33 वर्षीय महिलेला मागील गुन्ह्याच्या कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास आरोपींकडून दिला जात होता. केस मागे घेण्याच्या बाबतीत धमकावत आरोपींनी तिच्यावर अनेकदा बलात्कार देखील केला . फिर्यादीच्या मुलीला आरोपींनी मोटरसायकलवर घेऊन जात अर्धनग्न अवस्थेतील तिचे फोटो काढून केस मागे घेतली नाही तर ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला आरोपींनी रस्त्यात अडवले आणि त्यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून शिवीगाळ केली. हतबल झालेल्या महिलेने अखेर आरोपी जहांगीर कुरेशी आणि अजीम कुरेशी यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवलेला आहे. सदर प्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे .


Spread the love