पुणे हादरलं..प्रेमविवाह घटस्फोट अन मग ‘ वाटणी ‘ वरून जन्मदात्याला मारहाण

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना बारामती तालुक्यात सणासुदीच्या काळात समोर आलेली असून माळेगाव इथे दारू पिऊन जमीन वाटणीसाठी आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाच्या डोक्यात पहारीने वार घालून बापानेच खून केलेला आहे. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील ही घटना असून खून करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , गणेश लालासाहेब कोकरे ( वय 30 वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव असून लालासाहेब धोंडीबा कोकरे ( वय 60 वर्ष राहणार धुमाळवाडी बारामती ) असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे . गणेश हा गणेश याने प्रेमविवाह केला आणि त्यानंतर काही दिवसात त्याचा घटस्फोट देखील झालेला होता. सतत आई-वडिलांकडे जमिनीची वाटणी मागून तो मारहाण करत असल्याकारणाने आई-वडील देखील हतबल झालेले होते.

गणेश हा सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला आणि घराच्या दारावर लाथा बुक्क्या मारत घर उघडण्यासाठी विनंती करीत होता. दारू पिलेला असल्याकारणाने भीतीपोटी आई-वडिलांनी घराचा दरवाजा उघडला नाही. मंगळवारी पहाटे गणेशच्या वडिलांनी त्याच्या डोक्यात लोखंडी पहारीने सहा ते आठ घाव केले त्यात त्याचा मृत्यू झाला. माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे , तुषार भोर , सहाय्यक फौजदार शशिकांत वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. लालासाहेब याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करत असल्याची माहिती आहे .


Spread the love