पुण्यातील हत्याकांडाचा उलगडा , ‘ अपघात ‘ नव्हे तर तो थंड डोक्याने केलेला खून

Spread the love

पुण्यातील एका खळबळजनक अशा हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले असून लग्नासाठी अडसर ठरू नये म्हणून गरम पाण्यात बुडून सव्वा वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे. मुलाच्या आईच्या मैत्रिणीला देखील ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली असून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल 2023 मध्ये हा प्रकार घडलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , पतीपासून विभक्त असलेली एक विवाहित महिला सव्वा वर्षाच्या मुलासह चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहत होती. तिचे एका विवाहित तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू झाले आणि त्याने तिच्याकडे लग्नाचा तगादा सुरू केला मात्र तिच्याकडून टाळाटाळ केली जात होती. तिला पहिल्या पतीपासून मुलगा असल्याकारणाने ती असे करत असेल असे तिच्या प्रियकराला वाटले आणि ती घराबाहेर गेलेली असताना तिची मैत्रीण आणि सव्वा वर्षाचा चिमूरडा घरात असताना तिथे आलेल्या प्रियकराने बाथरूम मधील गरम पाण्याच्या बादलीत चिमूरड्याला बुडवले आणि भाजल्याने तो गंभीर जखमी झालेला होता. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

सदर प्रकरणात चिमुरड्याच्या आईची मैत्रीण घटनेच्या दिवशी घरात होती त्यावेळी तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी सुरुवातीला तिने आढेवेढे घेतले मात्र नंतर प्रियकर तरुणाने मुलाला गरम पाण्यात बुडवल्याची माहिती दिली. आरोपीने या मैत्रिणीला कुणाला काही सांगितले तर तुला देखील ठार करेन अशी देखील धमकी दिलेली होती त्यामुळे ती काही काळ गप्प राहिली मात्र दरम्यानच्या काळात प्रियकर फरार झाला होता.

प्रियकराची पत्नी देखील त्याच्यापासून विभक्त झाल्यामुळे तो एकटाच राहत होता त्यामुळे त्याच्या घरी देखील तो पोलिसांना आढळून आला नाही. तांत्रिक माहितीच्या आधारे तो एका जवळच्या व्यक्तीला सतत फोन करण्यात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतलेले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला अपघात ठरणारी ही दुर्घटना प्रत्यक्षात मात्र थंड डोक्याने केलेला खून असल्याचे समोर आलेले असून आरोपी प्रियकराला सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love