महाराष्ट्रात एक फसवणुकीचा अद्भुत प्रकार समोर आलेला असून नाशिक जिल्ह्यातील मनमाड इथे एक कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो असे सांगत आधीच 32 लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे . सदर प्रकरणी एका संशयित व्यक्तीच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मुराद शेख ( वय 37 वर्ष राहणार मनमाड ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून या प्रकरणातील संशयित असलेला इरफान सय्यद ( राहणार नाशिक ) याच्या विरोधात फिर्याद देण्यात आलेली आहे. इरफान सय्यद यांनी फिर्यादी शेख यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर एक कोटी रुपयांचे कर्ज तुम्हाला मंजूर करून देतो असे सांगत त्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर शुल्क असा बहाना करत तब्बल 32 लाख रुपये आधीच घेतले.
काही दिवस उलटल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल असे आरोपी सतत सांगत राहिला मात्र तरी देखील कुठल्याही स्वरूपात कर्ज मंजूर झाले नाही सोबतच दिलेली रक्कम देखील परत करण्यात आली नाही. फिर्यादी यांनी अनेकदा पाठपुरावा केला त्यावेळी त्याने सिक्युरिटी म्हणून दिलेला कोरा चेक स्वतःचे नाव टाकून वटवण्याचा देखील प्रकार केला असे शेख यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे