शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून येरवडा परिसरात राहणारी एक महिला पशुखाद्य घेऊन जात असताना विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क इथून तिचे अपहरण करून तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि चक्क विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे.
तक्रारदार महिलेने आरोपींच्या ताब्यातून कशीबशी सुटका करून घेतली आणि गुजरात मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पाच नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडलेली असून विमानतळ पोलिसांनी त्यानंतर कमलाबाई नावाच्या महिलेसह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क इथे एक रिक्षा भरधाव वेगाने आली आणि रिक्षाचालकाने पीडित महिलेच्या दुचाकीला थांबवले त्याचवेळी एक कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली त्यातून दोन जण उतरले आणि महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडीमध्येच आरोपींनी तिला एक इंजेक्शन दिले . महिलेला शुद्ध आली त्यावेळी ती एका महामार्गावर आलेली होती. तिने तिथून वॉशरूमला जाण्याचा बहाना केला आणि तिथून पलायन केले.
महिला जवळच्या जंगलात पळून गेली त्यानंतर गुजरातमध्ये गोध्रा इथे आहोत असे तिला समजले आणि तिने तात्काळ गुजरात पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या मदतीने ती पुण्यात आल्यानंतर तिने कमलाबाई नावाच्या महिलेसोबत इतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.