शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पुण्यात कोंढवा परिसरात समोर आलेला आहे . मशिदीमध्ये नमाज पठणासाठी म्हणून गेलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलावर अत्याचार करण्यात आलेला असून मशिदीमधील एका कर्मचाऱ्याकडून हा प्रकार करण्यात आलेला आहे. 10 नोव्हेंबर रोजीची ही घटना असून पीडित मुलाच्या मामाने कोंढवा पोलिसात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मोहम्मद युसुफ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात कोंढवा पोलिसात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मुलाच्या मामाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी मोहम्मद युसुफ हा फरार झालेला आहे.
फिर्यादी मामाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या भाच्याला नमाज पठणासाठी का जात नाही ? असा प्रश्न विचारला होता त्यावेळी पीडित मुलाने त्यांना या प्रकरणी माहिती दिली. 10 नोव्हेंबर रोजी कोंडवा येथील उस्मानिया मशिदीत मुलगा त्याच्या मित्रासोबत नमाज पठणासाठी गेलेला होता त्यावेळी आरोपीने मशिदीतील एका खोलीत त्याला घेऊन जात नमाज पठणासाठी थोडी माहिती दिली आणि त्यानंतर त्याच्या मित्राला मशिदी बाहेर जाण्यास सांगितले.
आरोपी मोहम्मद युसुफ याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर हा मुलगा घाबरून गेला. आरोपीने त्याला कुठे काही सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली. मुलगा घरी आल्यानंतर बदनामीच्या भीतीने त्याने हा प्रकार कोणाला सांगितला नाही मात्र अखेर प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.