आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये लहान मुले मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळून व्हिडिओ पाहत असतात . अनेक मुलांना सध्या मोबाईल गेम आणि व्हिडिओचे व्यसन लागलेले असून मुंबईत मालाड येथे शुक्रवारी मुलाकडून मोबाईल हिसकावून घेतला म्हणून सोळा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . मालवणी परिसरात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अटलांटा हॉस्पिटल इथून मुंबई पोलिसांना याप्रकरणी माहिती मिळाली त्यानुसार आशिष प्रकाश मूलिया या सोळा वर्षाच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेतलेला होता . आशिष याचे वडील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्यांनी मोबाईलवर गेम खेळायचे त्याला व्यसन जडले होते अशी माहिती दिलेली आहे.
16 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रकाश यांनी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला आणि गुपचूप वरती झोपायला जा असे सांगितले त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेलेले होते मात्र सकाळी 17 तारखेला आशिष याने किचनच्या पत्र्याला गळफास घेतलेला होता . वडिलांनी तात्काळ त्याला अटलांटा हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.