महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मस्ती करतो म्हणून एका पाच वर्षाच्या चिमूरड्याला गरम तव्याचे चटके देण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महिला आणि बालकल्याण विभागाशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण समोर आलेले असून पोलिसांनी या प्रकरणात निर्दयी काका आणि मावशी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरती सदावर्ते आणि विजय सदावर्ते ( राहणार समता नगर ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून चाईल्ड लाईनला या संदर्भात माहिती प्राप्त झालेली होती. औरंगाबाद येथील पाच वर्षांचा मुलगा नाशिक इथे समता नगर परिसरात राहणाऱ्या मावशी काकाकडे राहिला आहे.
आई-वडिलांच्या ताब्यातून सांभाळण्यासाठी म्हणून आणलेल्या या मुलाचा संशयित दांपत्यातून सतत छळ होत होता ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली मात्र कोणीही बोलत नसल्याकारणाने आरोपींचे फावले जात होते . शुक्रवारी निर्दयीपणाचा कळस गाठल्यानंतर याप्रकरणी नागरिकांनी पोलिसात खबर दिली आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय यांच्याशी पोलिसांनी देखील संपर्क साधल्यानंतर प्रकरण बाहेर आले आहे .