‘ डाकीण ‘ नाही सिद्ध करून दाखव , एकीला पळवून लावलं तर दुसरीला..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात समोर आलेला असून चक्क डाकीण असल्याचा संशय व्यक्त करत एका महिलेला स्मशानातील राख खाऊ घालण्यात आलेली आहे . मोलगी पोलीस ठाण्यात एका संशयित दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , अक्कलकुवा तालुक्यातील उखळीपाडा येथील संशयित असलेला धनश्रीगड आणि फुलवंती धनसिंग पाडवी यांनी एका महिलेला सात जुलै रोजी बेदम मारहाण केलेली होती. महिलेने शेतीच्या भांडणावरून तक्रार दिली म्हणून आरोपींनी तिला मारहाण केली.

आरोपींच्या मारहाणीनंतर घाबरून गेलेली पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय चिखली इथे स्थलांतरित झाले आणि त्या महिलेची उखळीपाडा येथील शेती एक संशयित महिला करत असल्याची माहिती आरोपींना मिळालेली होती. संशयित आरोपी तिथे पोहोचले आणि महिलेला आणि तिच्या पतीला डाकीण आहेत असे म्हणत मारहाण केली . ती डाकीण नाही म्हणून सिद्ध करण्यासाठी स्मशानभूमीत जळालेल्या मृतदेहाची राख खाण्यास आरोपींनी भाग पाडले.

आरोपींनी केलेल्या या प्रकारानंतर ही महिला घाबरून गेली आणि तिने मोलगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष्ट अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादूटोणा कायद्याअंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love