महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून भाभा अनुसंशोधन केंद्र कॉर्टरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे . आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला कोल्ड्रिंकमध्ये मिक्स करून एक द्रव्य दिले आणि त्यानंतर हा गुन्हा केला.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित तरुणी ही चेंबूरच्या टपाल कॉलनीत राहत असून बुधवार आणि गुरुवारच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे . पीडित विद्यार्थिनी तिच्या वडिलांच्या कॉर्टरमध्ये राहत असून तिचे वडील कामाच्या जबाबदारीमुळे इतर ठिकाणी राहतात . आरोपीचे वडील देखील बीएआरसीमध्ये काम करत असून त्यामुळे आरोपी देखील याच कॉर्टरमध्ये राहतो . ओळखीचा गैरफायदा गेल आरोपीने हा प्रकार केल्याचे फिर्यादी विद्यार्थिनीचे म्हणणे आहे.
आरोपीचे कुटुंबीय दुसऱ्या गावी गेलेले होते म्हणून आरोपीने बुधवारी रात्री त्याच्या एका मित्राला आपल्या घरी बोलावले आणि अन्न शिजवण्यासाठी विद्यार्थिनीला फोन करून इंडक्शन कुकर आणायला सांगितले . पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली आणि तिथे काही वेळ थांबली त्यानंतर आरोपीने तिला कोल्ड्रिंकमध्ये मिक्स केलेले द्रव्य पिण्यास दिले त्यानंतर ती बेशुद्ध पडली त्यानंतर आरोपी आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला.
पहाटेच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर तिला झाला प्रकार लक्षात आला त्यावेळी तिने शेजारच्या काही जणांना आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली त्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांचे वय 26 आणि 30 वर्ष आहे . दोन्ही आरोपींची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे .