पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका दुकानातून घेतलेली शेगडी आणि मिक्सर यांचे पैसे परत मागितले म्हणून वाद झाल्याने दोन जणांनी मिळून चक्क एक दुकानच पेटवून दिल्याचा प्रकार दिघीमधील बालाजी होम अप्लायन्सेस इथे घडलेला आहे. दिघी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रकाश मगाराम कुमावत ( वय 29 राहणार परांडे नगर दिघी ) यांनी याप्रकरणी दिघी पोलिसात फिर्याद दिलेली असून अजित ज्ञानोबा सूर्यवंशी ( वय 28 राहणार दत्तनगर दिघी ) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
20 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास प्रकाश कुमावत यांचे परांडे नगर इथे बालाजी होम अप्लायन्सेस नावाने दुकान असून या दुकानातून आरोपी अजित सूर्यवंशी याने शेगडी आणि मिक्सर नेलेले होते . त्याचे पैसे मागितले म्हणून अजित आणि त्याच्या साथीदारांनी दुकानातील दुचाकी आणि सोफ्यावर पेट्रोल टाकून दुकान पेटवण्याचा प्रयत्न केला आपले यामध्ये 20 हजारांचे नुकसान झालेले आहे असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.