नाशिक हादरलं..दारूच्या नशेत झिंगलेला पती घरी आला अन ‘ अघटित ‘ घडलं

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथे समोर आलेली असून दारूच्या नशेत झिंग झालेल्या एका व्यक्तीने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर तिच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत तिची हत्या केलेली आहे. राजीव गांधी नगर परिसरात ही घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मात्र आरोपी फरार असल्याकारणाने त्याचा शोध सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुरेश पवार असे आरोपीचे नाव असून तो शहरातील निफाड रोड परिसरात राजीव गांधी नगर येथे त्याची पत्नी भारती सुरेश पवार ( वय 26 ) हिच्यासोबत राहत होता. विवाहित महिलेचा मृतदेह पाराशरी नदीकाठी सकाळी दहाच्या सुमारास आढळून आला. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिलेचा मृत्यू झालेला होता आणि तिच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या.

मयत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेले असून भारती यांच्या डोक्यावर हत्याराने वार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात संशयित पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी फरार झालेल्या पतीच्या शोधात पथके रवाना करण्यात आलेली असल्याची माहिती दिलेली आहे .


Spread the love