ललित पाटील प्रकरणात ससूनचा आणखीन एक जण ताब्यात

Spread the love

पुणे शहरातील ससून रुग्णालयातून ड्रज माफिया ललित पाटील हा बेपत्ता झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती आणि आता तर रुग्णालयीन प्रशासनामध्ये दुवा असल्याच्या कारणावरून तेथील कर्मचारी असलेला महेंद्र आप्पा शेवते (वय 45 राहणार बंडगार्डन ) याला अटक करण्यात आलेली आहे.

सदर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ललित पाटील हा आजारी असल्याचा बहाना करत या रुग्णालयात दाखल झालेला होता . तिथे त्याची शाही बडदास्त ठेवण्यात आलेली होती आणि रुग्णालयात राहूनच तो अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवत होता. ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेले असून या प्रकरणात आत्तापर्यंत 16 जणांना अटक झालेली आहे त्यातील तीन अधिकारी आणि दोन पोलीस देखील निलंबित झालेले आहेत. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना देखील पदमुक्त करण्यात आलेले असून रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या महेंद्र शेवते याचा देखील सहभाग आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे.

आरोग्य प्रशासनातील संशयित व्यक्तींबद्दल सध्या माहिती संकलित केली जात असून या प्रकरणात आणखीन व्यक्तींना देखील अटक होण्याची शक्यता आहे . कारागृहातून महिनो महिने ललित पाटील याला रुग्णालयात पाठवण्यात यायचे आणि त्यानंतर रुग्णालयात राहूनच तो त्याचा अमली पदार्थाचा व्यापार चालवायचा हे देखील तपासात समोर आलेले आहे.


Spread the love