लग्न कधी करणार ? म्हणताच दिलं हाकलून , महिला म्हणतेय तब्बल इतकी..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे समोर आलेली असून एका तीस वर्षे महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तब्बल सव्वा दोन वर्ष तिचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर पीडित महिलेने लग्नाची मागणी केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देत हाकलून देण्यात आले . आरोपीच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 18 जून 2021 पासून तर 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला . फिर्यादी महिलेने आरोपीला लग्न कधी करणार ? असे विचारले त्यावेळी आरोपीने माझे यापूर्वीच लग्न झालेले असून मी तुझ्यासोबत आता लग्न करू शकत नाही अशी माहिती देत तिला हाकलून दिले आणि जिवे मारण्याची देखील धमकी दिली.

आतिश चंद्रकांत सोमवंशी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून पीडित महिलेने त्याच्या विरोधात उदगीर पोलिसात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीने स्वतःचे लग्न झालेले असताना देखील ही माहिती आपल्यापासून दडवून ठेवली असे देखील तिचे म्हणणे आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पीएम देवकते करत असल्याची माहिती आहे.


Spread the love