‘ संजूशेठ ‘ तलाठी भाऊसाहेब आले टप्प्यात , सापळा रचलेला होता अन..

Spread the love

सरकार दरबारी लाचखोरी रोखण्यासाठी कितीही प्रयत्न करण्यात येत असले तरी देखील सोकावलेले सरकारी बाबू पैसे मिळवण्यासाठी काही ना काही संधी शोधत असतात असाच एक प्रकार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड इथे समोर आलेला आहे . वडिलोपार्जित शेती वारसा हक्क नावावर करण्यासाठी एका व्यक्तीच्या मुलाला लाचेची मागणी करणाऱ्या तलाठी भाऊसाहेबाला 18 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेले आहे. तलाठ्यासोबत इतर एका खाजगी व्यक्तीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , संजय दिगंबर विसपुते ( वय 48 ) असे या तलाठी भाऊसाहेबांचे नाव असून सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील ते लोकसेवक आहेत . तक्रारदार व्यक्ती यांची वडीलोपार्जित शेती वडिलांच्या नावावर असून त्याचे वाटणी पत्र तयार करून 60 आर शेतजमिनीची तक्रारदार यांच्या नावाची सातबारा नोंद घेण्यासाठी आरोपीने 20000 रुपयांच्या लाचेची मागणी केलेली होती लाच देण्याची तयारी नसल्याकारणाने तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबर वर फोन करून माहिती दिली.तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.

सदर प्रकरणी तलाठी संजय दिगंबर विसपुते आणि खाजगी इसम गजानन सोमासे ( दोघेही राहणार आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर ) यांना एक तारखेला लाच घेत असताना पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे . दोघांच्याही विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.


Spread the love