शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून जागेत मुरूम टाकण्यावरून पाच जणांनी चार जणांना बेदम मारहाण केलेली आहे . खेड तालुक्यातील शिंदे गावातील ही घटना असून रविवारी 26 तारखेला हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अर्जुन हनुमंत पानमंद ( वय 49 राहणार शिंदे तालुका खेड ) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिलेली असून विकास जगन्नाथ पानबंद , आनंद जगन्नाथ पानमंद ,उत्तम जगन्नाथ पानमंद ,बीबी जगन्नाथ पानमंद ,जगन्नाथ रामचंद्र पानमंद ( सर्वजण राहणार शिंदे तालुका खेड ) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
शिंदे गावांमध्ये सकाळी फिर्यादी अर्जुन पानमंद आणि त्यांचा मुलगा श्रीनाथ हे त्यांच्या जागेमध्ये डंपरने मुरूम टाकत होते त्यावेळी वरील सर्वजण तिथे आले आणि त्यांनी अर्जुन आणि श्रीनाथ यांना मुरूम टाकू नका असे सांगितले. डंपरच्या समोर दुचाकी लावून अडवणूक करण्यात आली तसेच डंपर चालक आणि सुपरवायझर यांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलेले असून सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.