सोशल मीडियावर सध्या एका मुलीची जोरदार चर्चा असून या मुलीने वडिलांचे यकृत नादुरुस्त झाल्यानंतर मृत्यूच्या दारात वडील पोहोचल्यानंतर स्वतःचे यकृत दान करून तिने वडिलांना जीवनदान दिलेले आहे . वडिलांसाठी इतका मोठा त्याग करणाऱ्या या मुलीचे सध्या सोशल मीडियात जोरदार कौतुक केले जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार , साक्षी नारायण पाटील असे या मुलीचे नाव असून तिचे वय अवघे 19 वर्षे आहे. साक्षी ही पनवेलमधील भिंगार अजिवली येथील रहिवासी असून बीएमएसचे शिक्षण घेते. तिचे वडील नारायण पाटील यांना पाच वर्षांपासून यकृताचा त्रास होता आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती.
डॉक्टरांनी शेवटी त्यांचे यकृत खराब झाल्याची माहिती दिली आणि यकृत प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगितलेले होते . वडील मरण्याच्या दारात आहेत हे लक्षात आल्यानंतर साक्षीने स्वतःचे यकृत वडिलांना दान करून जीवनदान देण्याचे ठरवले आणि त्यानंतर डॉक्टर हूनेद हातीम आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी ग्लोबल हॉस्पिटल परेल इथे त्यांचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले. वडिलांना मरणाच्या दारातून माघारी आणणाऱ्या या मुलीचे सोशल मीडियात जोरदार कौतुक केले जात आहे.