महाराष्ट्रात दोन मैत्रिणींमध्ये कथित अनैतिक संबंधावरून भांडण झाल्याचा प्रकार भिवंडी येथे समोर आलेला आहे. एका विवाहितेच्या पतीचे तिच्याच मैत्रिणी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय एकीला आला आणि त्यातून हा प्रकार घडला. शांतीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मैत्रिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फरजाना ( वय 39 ) असे गुन्हा दाखल झालेल्या मैत्रिणीचे नाव आहे तर लक्ष्मी असे तिच्या मैत्रिणीचे नाव आहे . दोघीही चांगल्या मैत्रिणी असून भांडण होण्यापूर्वी एकाच परिसरात राहायच्या त्यानंतर काही कालावधीत दोघी वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागल्या.
दरम्यानच्या काळात फरजाना हिला तिच्या पतीचे लक्ष्मी हिच्या सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि त्यातून तिने लक्ष्मी राहत असलेल्या गायत्री नगर परिसरात जाऊन तिला शिवीगाळ केली. लक्ष्मी तिला समजावून सांगत होती मात्र तिने काहीही ऐकले नाही आणि तिला मारहाण केली म्हणून अखेर फर्जना शकील खान ( वय 39 ) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.