महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून मानसिक त्रासाला कंटाळून घरातून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा अखेर एका विहिरीत मृतदेह आढळून आलेला आहे. सासुरवाडीच्या तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली असून सासू मात्र फरार झालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कोमल श्रीकांत राऊत ( वय 25 वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून आष्टी तालुक्यातील त्यांचे माहेर होते. श्रीकांत कल्याण राऊत याच्यासोबत विवाह झाल्यानंतर कोमल हिला तिचा पती , सासरा , सासू , दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. 26 नोव्हेंबर रोजी राहत्या घरातून ती निघून गेली आणि त्यानंतर राऊत यांच्या मालकीच्याच विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.
कोमल यांच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दिली होती. कोमल यांच्या आई लक्ष्मी गायकवाड यांनी कोमल हिचा पती श्रीकांत कल्याण राऊत , सासरा कल्याण विठ्ठल राऊत , सासू आशाबाई कल्याण राऊत , दीर निलेश कल्याण राऊत यांच्या विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे.