‘ फक्त ‘ इतक्या रुपयांचा विषय होता , भेटायला म्हणून बोलावलं अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना साताऱ्यात समोर आलेली असून उसने दिलेले पाच हजार रुपये परत दिले नाहीत म्हणून एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलेला आहे . पाटण तालुक्यातील चाफळ जाळगेवाडी रस्त्यावर माथनेवाडी हद्दीत ही घटना गुरुवारी 23 तारखेला घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पंडित बाबुराव चव्हाण ( वय 52 राहणार खडकवाडी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी अनिकेत मारुती जगदाळे ( वय 25 राहणार जाळगेवाडी ) याला अटक करण्यात आलेली आहे. पाटण तालुक्यातील माथनेवाडी हद्दीत चाफळ जाळगेवाडी रस्त्यालगत भरत दत्तात्रय शिंदे यांच्या शेतात पत्र्याचे एक शेड बांधलेले आहे. पंडित चव्हाण नेहमीप्रमाणे तिथे थांबलेले असताना आरोपी अनिकेत तिथे आला आणि त्याने उसने दिलेले पाच हजार रुपये तात्काळ देण्याची मागणी केली . त्यांच्यात वाद झाल्यानंतर अनिकेतने पंडित चव्हाण यांच्या पोटावर मानेवर धारदार शस्त्राने वार केले त्यात पंडित यांचा मृत्यू झाला आहे .


Spread the love