महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून भारतीय खाद्य निगममध्ये तुम्हाला नोकरीला लावतो असे सांगत एका व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर नवीन पनवेल येथील कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , महेश सुभाष ताम्हणकर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून एका व्यक्तीने त्यांना हरीश प्रकाश काशीद ( राहणार कामोठे ) , वैभव कुबल ( घनसोली ), मंगल संजय जाधव ( उल्हासनगर ) , मोहित कुमार राणा , विशाल गुप्ता हे भारतीय खाद्य निगम इथे नोकरीला लावण्याचे काम करतात अशी माहिती सांगितलेली होती त्यानंतर सदर सर्व आरोपींनी त्यानंतर महेश यांना विश्वासात घेत तुम्हाला नोकरीला लावतो असे सांगत आठ लाख रुपये रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने घेतले आणि त्यानंतर नोकरीला लावले नाही सोबतच पैसे देखील परत केले नाहीत .
आपली फसवणूक झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना पैसे मागितले तेव्हा त्यांनी आठ लाख रुपयांचा चेक दिला मात्र तो देखील बाउन्स झाला. फिर्यादी यांनी त्यानंतर दिल्ली पंजाब नागपूर विशाखापट्टणम इथे देखील आणखीन माहिती घेतली असता इतर व्यक्तींची देखील आरोपींनी अशीच फसवणूक केल्याचे समोर आलेली आहे . कामोठे पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.