संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आलेले असून नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात एका कारखान्यात सापडलेले रसायन हे गुजरातच्या मार्गाने नाशिकमध्ये आल्याचे समोर आलेले आहे . सदर माहिती शहर अमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दिलेली आहे .
नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नाशिक रोड पोलिसांनी देखील एमडीचा कारखाना उध्वस्त केलेला होता. संशयित शिवा अंबादास शिंदे याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. त्याच्या पोलीस कोठडीत देखील न्यायालयाने तीन दिवसाची वाढ केलेली असून संशयित भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पुण्यातून नाशिकमध्ये आणण्यात आलेले होते.
दोन्ही आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून हा कारखाना सुरू केला होता यासंदर्भात कसे कसे व्यवहार झालेले आहेत या संदर्भातील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे . संशयित असलेला शिवा अंबादास शिंदे याचे वकीलपत्र कोणीही घेतले नाही म्हणून विधी प्राधिकरणकडून त्याला वकील देण्यात आलेला आहे. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या गोदामात असलेला कच्चामाल आणि रसायन गुजरात मार्गे पोहोचल्याचे तपासात समोर आलेले आहे तर दुसरीकडे ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यास देखील अटक करण्यात आलेली आहे तर येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरसाळे देखील याच प्रकरणात सध्या अटकेत आहे.