महाराष्ट्रात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून अशाच एका प्रकरणात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी मुंबईतून पोलीस उत्तर प्रदेशात गेले मात्र आरोपीने त्यानंतर आत्महत्या केली. मुंबईतील डी एन नगर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचारी यामुळे अडचणीत आलेले असून आरोपीला नोटीस जारी करण्यासाठी ते उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथे गेलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केली. फिरोजाबाद पोलीस ठाण्यात त्यानंतर तीन पोलिसांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुरज राठोड ( वय बावीस वर्ष ) असे मयत तरुणाचे नाव असून दोन डिसेंबर रोजी त्याने आत्महत्या केली . मयत तरुणाच्या वडिलांनी फिरोजाबाद पोलिसांना मुंबई पोलिसांच्या विरोधात माहिती दिली आणि त्यांच्या दबावामुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केली असे म्हटले आहे . डी एन नगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष मरसल , हवलदार गायकवाड आणि म्हेत्रे हे आत्महत्येच्या एक दिवस आधी फिरोजाबाद इथे आलेले होते त्यावेळी त्यांनी सूरजला मारहाण केली आणि त्याच्याकडून सव्वा लाख रुपये घेतले , ‘ असा आरोप मयत तरुणाच्या वडिलांनी केलेला आहे
डी एन नगर पोलीस ठाण्याकडून मात्र सर्व तपशिलाच्या आधारे त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही त्याच्या घरी गेलो होतो . कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत त्याला फौजदारी प्रक्रिया अंतर्गत त्याला नोटीस बजावली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही तिघेही मुंबईत परतलो असे म्हटलेले आहे.