वीटभट्टीवर काम अन उसाच्या शेतात मुक्काम , अल्पवयीन मुलीची पोलिसांनी केली सुटका

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार यवतमाळमध्ये समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या तरुणाला सांगली जिल्ह्यातील येवलेवाडी येथे अटक करण्यात आलेली आहे . पीडित मुलीची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात देखील आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , आकाश रमेश वाडेकर ( वय बावीस वर्षे राहणार दत्तापूर तालुका कळंब ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून जवाहर नगर येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी समोर आलेली होती. यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. जवाहर नगर येथील सुतगिरणीत काम करण्यासाठी काही मुले येत असायची त्यापैकी कोणीतरी या मुलीला पळून नेल्याचा संशय बळावला त्यानंतर ही मुलगी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील येवलेवाडी इथे असल्याचे समजले.

आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी हे सांगली जिल्ह्यातील येवलेवाडी इथे एका उसाच्या शेतात पिडीतेसोबत राहत होता. यवतमाळमध्ये त्यांना आणण्यात आलेले असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समिती समोर तिला हजर करण्यात आलेले आहे. पोलीस अधिकारी संजय पुजलवार , ठाणेदार सतीश चौरे , सायबर सेलच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे.


Spread the love