‘ मी विकी मला ओळखत नाही का ? ‘, हॉटेल व्यावसायिकाला भलताच अनुभव

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूरमध्ये समोर आलेली असून गणेश पेठ हद्दीतील एका हॉटेलवाल्याला दोन हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विकी सिताराम दापोडे ( वय 24 वर्ष राहणार इमाम वाडा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपीने चाकू दाखवत हॉटेल चालकाला ठार मारण्याची धमकी देत दोन हजार रुपये मागितले होते. प्रमोद अमरेश बहादुर सिंगम ( वय 39 राहणार इमाम वाडा ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव आहे.

गणेश पेठ हद्दीतील हॉटेल जाफरभाई दिल्ली दरबार असे त्यांच्या हॉटेलचे नाव असून चार डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ते हॉटेलच्या काउंटरवर बसलेले होते त्यावेळी आरोपी व्यक्ती तिथे आला आणि ‘ त्याने मला ओळखत नाही का मी विकी आहे ‘ असे म्हणत खंडणी मागितली.

बहादुर सिंग यांचा मुलगा आरोपीला समजावण्यासाठी आला त्यावेळी त्याने चाकूचा धाक दाखवत दोन हजार रुपये तरी तुला द्यावेच लागतील तरच तुझे हॉटेल व्यवस्थित चालू राहील अशी धमकी दिली. मागच्या हप्त्यात एक हजार रुपये तुला दिलेले आहेत असे बहादुर सिंग यांनी सांगितले मात्र आरोपीने आताही दोन हजार रुपये द्या असे तो म्हणाला . पोलिसांनी त्यानंतर आरोपीच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love