पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून तक्रारीची चौकशी करण्यासाठी म्हणून गेलेल्या पोलिसांसोबत उद्धट वर्तन करून पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यावर महिला पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडण्याचा संतापजनक प्रकार येरवडा पोलीस ठाण्यात नऊ तारखेला घडलेला आहे . तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मनोज महाले ( वय 42 ) , दिपाली महाले ( वय 42 ) आणि राधेय महाले ( वय 18 राहणार शास्त्रीनगर येरवडा ) अशी संशयित व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात पोलीस शिपाई सोमनाथ भोराडे यांनी फिर्याद दिलेली आहे.
तक्रारदार यांच्या चौकशीची पूर्तता करण्यासाठी मनोज महाले याला बोलवण्यासाठी पोलीस शिपाई भोराडे हे गेलेले होते. महाले यांनी त्यांच्यासोबत उद्धट वर्तन केले मात्र त्यानंतर तीनही जण पोलीस ठाण्यात आले आणि तक्रारदार यांच्या अंगावर पोलीस ठाण्यातच धावून जात होते. आरोपीस समजावण्याचा प्रयत्न पोलीस करत होते मात्र त्याच वेळी तीनही जण दिपाली महाले यांच्या अंगावर धावून गेले . पोलीस निरीक्षक कांचन जाधव व महिला शिपाई त्यांना समजावून सांगत असताना पोलीस निरीक्षक यांची कॉलर पकडण्यात आली असे तक्रारीत म्हटलेले आहे.