पुण्यातील ‘ इझी पे ‘ फसवणूक प्रकरण , आणखीन दोन जणांना झाली अटक

Spread the love

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून ऑनलाइन पेमेंट सुविधा देणारी इझी पे कंपनीलाच 65 प्रतिनिधींनी तांत्रिक सुविधेचा गैरवापर करून तब्बल साडेतीन कोटी रुपयांना चुना लावलेला आहे. सदर प्रकरणी सायबर पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर दोन जणांना कोलकत्ता येथून अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उबेद अन्सारी ( वय 36 ), आयुब बशीर आलम ( वय वीस दोघेही राहणार गया बिहार ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघांनाही पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आलेली आहे यापूर्वी देखील याच प्रकरणात अंकित कुमार अशोक पांडे ( वय वीस वर्ष राहणार नवादा बिहार ) आणि छोटू उर्फ एजाज आलम यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन पेमेंट सुविधा देणाऱ्या इझी पे कंपनीचे येरवडा येथे कार्यालय असून देशभरात कंपनी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते . कंपनीने नोंदणीकृत प्रतिनिधींची यासाठी नेमणूक केलेली असून कंपनीच्या 65 प्रतिनिधींनी 11 ऑगस्ट 2022 पासून तांत्रिक प्रक्रियेचा तसेच स्वतःला दिलेल्या अॅक्सेसचा गैरवापर करत कंपनीच्या खात्यातून तब्बल साडेतीन कोटी रुपये लंपास केले. व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात फिर्याद देण्यात आलेली होती त्यानंतर अन्सारी आणि आलम यांना अटक करण्यात आलेली आहे.


Spread the love