शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये फसवणुकीचे अजब प्रकार रोज समोर येत असून असाच एक प्रकार पुण्यात पुन्हा एकदा समोर आलेला आहे . तुमच्या मुलामुलींना हंगेरी येथील एका स्पर्धेत डान्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देईल असे आमिष दाखवत पालकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले मात्र अखेर फसवणूक झाल्यानंतर पालकांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नृत्य प्रशिक्षक स्वप्निल मिलिंद लोंढे ( वय तेहतीस राहणार वडगाव बुद्रुक ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून फिर्यादी यांची मुलगी इयत्ता सहावीत शिकत आहे. नांदेड सिटी मधील एका डान्स क्लासमध्ये ती शिकायला जाते तिथे स्वप्निल लोंढे यांनी ऑगस्टमध्ये पालकांची बैठक घेत तुमच्या मुला मुलींना हंगेरीतील बुडापेस्ट इथे स्पर्धेत घेऊन जाईल त्या स्पर्धेसाठी 84 हजार रुपये खर्च येणार आहे सोबत पालक देखील असतील , असे सांगितले होते.
आपल्या पाल्यांना प्रदेशात डान्स करण्याची संधी मिळते या आमिषाला भुलून अनेक जणांनी फिर्यादी यास लाखो रुपये दिले मात्र स्पर्धेची वेळ जवळ येऊ लागली तेव्हा त्याने टाळाटाळ करणे सुरू केले . धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्पर्धेची खोटी कागदपत्रे , विमानाचे बनावट तिकिटे देखील दाखवली मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलिसात धाव घेतलेली आहे.