फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या पुण्यात समोर आलेला असून परदेशात पाठवण्यात आलेल्या भेटवस्तूमध्ये अमली पदार्थ सापडलेले आहेत असे सांगत भीती घालून सायबर भामट्यांनी एका संगणक अभियंत्याला तब्बल 28 लाख रुपयांना गंडा घातलेला आहे . आठ तारखेला शुक्रवारी हा प्रकार समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संगणक अभियंता असलेला हा तरुण एका उच्चभ्रू कंपनीत काम करतो . त्याच्या मोबाईलवर सायबर भामट्यांनी संपर्क साधला आणि तुम्ही तैवानला एक भेटवस्तूचे खोके पाठवलेले आहे . विमानतळावर त्यात अमली पदार्थ आढळून आलेले आहेत त्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल . मुंबई गुन्हे शाखेत तात्काळ संपर्क करा असे सांगत समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला.
काही वेळाने पुन्हा संगणक अभियंता असलेल्या या व्यक्तीला आरोपींचा फोन आला त्यावेळी त्याने आम्ही तुमचा फोन मुंबई गुन्हे शाखेत ट्रान्सफर करून देतो असे सांगत समोरील अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी तात्काळ तुमच्या विरोधात कारवाई होईल याची भीती घालत एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले आणि त्यामध्ये बँकेच्या खात्याची आणि आधार कार्डची माहिती घेण्यात आली. काही वेळातच 27 लाख 98 हजार रुपये खात्यातून गायब झाल्यावर आपली फसवणूक झाल्याची जाणीव फिर्यादी झाली आणि सिंहगड पोलिसांत तक्रार दिली.