पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईला विरोध करताना एका भाजी विक्रेत्याने कर्मचाऱ्यांच्या पायावर हातगाडी घातली आणि त्याला जखमी करून त्यानंतर भाजी विक्रेता पसार झालेला आहे . महापालिकेच्या कारवाईवर देखील अनेक नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून महापालिकेच्या कारवाईचा बडगा केवळ गोरगरीब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उगारण्यात येतो मात्र धनदांगड्या व्यक्तींच्या बांधकामावर कारवाईला महापालिका अधिकारी धजावत नाही अशी देखील टीका होत आहे. महापालिकेच्या लिपिक माधुरी पंडित यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी एका तीन चाकी गाडी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार , आरोपी कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या गाडी रस्त्यात लावून वाटाण्याची विक्री करत होता त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण कारवाई विभागाचे पथक तिथे गेले त्यावेळी आरोपी रणजीत दामोदर हिरवे याने धक्का मारून कर्मचाऱ्याला खाली पाडले आणि त्यानंतर त्यांच्या पायावर गाडी घालून तिथून निघून गेला. चिंचवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.