पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी महिला आली अन चुकून गोळी सुटली , पहा व्हिडीओ

Spread the love

देशात एक धक्कादायक असा प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड इथे समोर आलेला असून पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कागदपत्रासाठी पोलीस रिपोर्ट घेण्यासाठी एक महिला आलेली होती मात्र त्याचवेळी पोलिसांच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि महिला गंभीर जखमी झाली . सदर घटनेनंतर जखमी महिलेच्या कुटुंबीयांकडून संबंधित अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप करण्यात आलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , अलीगड कोतवाली नगर पोलीस ठाण्यात ही महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आलेली होती . पोलिसाच्या टेबल समोर ती उभी असताना पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज शर्मा यांच्या सरकारी बंदुकीतून गोळी झाडली गेली आणि ती गोळी महिलेच्या डोक्याजवळ कानाच्या वर लागली . घटना घडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज शर्मा फरार असून त्यास निलंबित करण्यात आलेले आहे.

इशरत जहाँ असे जखमी महिलेचे नाव असून त्या आणि त्यांचा मुलगा ईशान एका टेबल जवळ उभे राहून अधिकाऱ्याची वाट पाहत होते त्याचवेळी आरोपी मनोज शर्मा तिथे आले आणि त्यांचा सहकारी पोलीस त्यांचे पिस्तूल घेऊन तिथे आला . सहकाऱ्याने शर्मा यांच्याकडे पिस्तूल सोपवले आणि त्यानंतर शर्मा यांनी बंदूक लोड केली आणि ट्रिगर दाबला त्यावेळी बंदुकीतून गोळी सुटली आणि इशरत यांच्या कानाजवळ घुसली.

गोळी लागल्यानंतर म्हणून शर्मा यांनी बंदूक ठेवली आणि इशरत यांच्याजवळ गेले मात्र त्या जमिनीवर कोसळलेल्या होत्या . पोलीस ठाण्यात गर्दी जमा झाली त्याचा फायदा घेत मनोज शर्मा फरार झाला. संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिलेल्या असून ठाण्यातील गोंधळ पाहिल्यानंतर आणखीन अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. इशरत जहा यांच्या कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केलेला असून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रभारी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले होते . पैशावरून इशरत यांचे कुटुंबीय आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची देखील झालेली होती त्यामुळेच अधिकाऱ्याने इशरत यांच्यावर गोळी झाडली असा आरोप केलेला आहे.


Spread the love