सहा मजली इमारतीवरून घेतली उडी , गाडीच्या बोनेटवर पडला अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर शहरात समोर आलेला असून पद्मानगर परिसरात एका सहा मजली इमारतीवरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलेली असून धक्कादायक बाब म्हणजे उडी मारल्यानंतर हा तरुण चार चाकी वाहनाच्या बोनेटवर कोसळला आणि जागेवरच ठार झाला.

उपलब्ध माहितीनुसार , भागवती प्रसाद सुभाष अन्नदास ( वय 35 वर्ष राहणार वज्रेश्वरी नगर सोलापूर ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याला आई-वडील नव्हते . मावस भावाच्या घरी जेवण करण्यासाठी तो जात असायचा सोबतच कुठलाही काम धंदा करत नसल्याने त्याला दारूचे देखील व्यसन जडलेले होते.

मावस भावाची परिस्थिती देखील गरीब असून तो मोलमजुरी करून कसाबसा कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता . घराजवळ असलेल्या सात मजली इमारतीवर भागवती प्रसाद जा ये करत असायचा अशाच पद्धतीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावर तो रिकाम्या पोर्चमध्ये गेला आणि त्याने खाली उडी मारली. चार चाकी वाहनाच्या बोनेटवर कोसळून त्याचा मृत्यू झालेला असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.


Spread the love