महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला असून सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर एका व्यक्तीने 28 वर्षे विवाहित महिलेसोबत खाजगी क्षणाचे काही फोटो काढले आणि त्याच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरू केले . महिलेने काही काळ त्याला प्रतिसाद दिला मात्र त्यानंतर अखेर महिलेच्या कुटुंबीयांपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि कुटुंबीयांनी देखील त्याला अनेकदा समजावून सांगितले मात्र त्याच्या वर्तनात काही बदल झाला नाही म्हणून पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी जे काही केले ते कल्पनेपलीकडचे होते.
उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्रभूषण दंडीमे ( वय 28 राहणार मुकुंदवाडी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी गुंडांच्या मदतीने त्याचे विमानतळ परिसरातून अपहरण करत त्याला बेदम मार दिला आणि दहा तास एका खोलीवर नेऊन त्याच्या गुप्तांगावर देखील जखमा केल्या . पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात यापूर्वीच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
2019 साली आरोपी सौरभ याच्यासोबत पीडित महिलेची फेसबुकवर ओळख झालेली होती . अवघ्या दीड महिन्यात त्यांच्यातील मैत्री आणि भेटीगाठी देखील सुरू झाल्या . 23 एप्रिल २०२२ रोजी पीडित महिलेने त्याला वाढदिवसानिमित्त सोन्याची अंगठी भेट दिली त्यानंतर तो तिच्या घरी देखील जाऊ लागला मात्र तिने घरी येण्यास त्याला मज्जाव केला . माझा संसार उध्वस्त होईल असे करू नकोस असे देखील तिने सांगितले मात्र सौरभ याने तिचे चोरून काही फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
महिलेला आरोपीने त्यानंतर लैंगिक सुखासाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले त्या बदल्यात त्याने तिच्याकडून मोठ्या रकमा वसूल केल्या आणि तब्बल आठ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या देखील घेतल्या . आयफोन घेण्यासाठी पुन्हा सोन्याचा नेकलेस आणि चार तोळ्यांचे दागिने देखील आरोपीने महिलेकडून ब्लॅकमेल करत घेतले दरम्यानच्या काळात हा प्रकार महिलेच्या घरच्यांना देखील समजला.
पीडित महिलेचा पती , भाऊ आणि वडील आरोपी सौरभ याचा शोध घेत होते त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता चिकलठाणा विमानतळ रस्त्यावर सौरभ याच्या गाडीच्या काचा फोडून त्याला काही आरोपींनी त्याला ओढून बाहेर काढले आणि मारहाण करत कारमध्ये बसवून किराडपुरा येथील एका इमारतीत घेऊन जाऊन बेदम मारहाण करण्यात आली.
इमारतीत पोहोचले त्यावेळी तिथे पीडित महिलेचा पती , वडील आणि भाऊ होते . कारमधून उतरल्यानंतर सौरभ याच्यावर मागून हल्ला चढवला त्याचे कपडे काढून शूटिंग केली आणि आधार कार्ड , पॅन कार्ड झेरॉक्स बॉण्डला लावून त्याच्या सह्या घेतल्या. आरोपींनी त्याच्या गुप्तांगात वस्तू घुसवण्याचा देखील प्रयत्न केला त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे. रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्याचा हा छळ सुरू होता . रक्तबंबाळ झाल्यानंतर त्याला दुसरे कपडे देण्यात आले आणि त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर त्याला बळीराम पाटील शाळेसमोर आणून सोडले. सौरभ याचा रुग्णालयातच जबाब नोंदवलेला असून पीडित महिलेच्या कुटुंबासोबत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .पीडित महिलेचे कुटुंबीय देखील त्यानंतर फरार झालेले आहे.