महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आलेला असून चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर एका महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे. आरोपी महिलेने याआधी प्रियकराला विवस्त्र करून मारहाण देखील केली होती आणि साई टेकडी परिसरात त्याला फेकून देण्यात आलेले होते मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आनंद साहेबराव वाहूळ असे जखमी मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून आनंद हा आरोपी महिलेसोबत चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता . महिलेला एक मुलगा देखील असून महिलेने आनंद याला या पुढील काळात आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येणार नाही त्यामुळे तू मला सोडून दे असे म्हटलेले होते मात्र तो ऐकत नव्हता.
महिलेने त्याला वारंवार ही लिव्ह इन रिलेशनशिप पासून ब्रेक घेण्याची विनंती केली मात्र तो ऐकत नसल्याकारणाने महिलेने अखेर चार जणांना बोलावले आणि त्याला विवस्त्र करून मारहाण केली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे. आनंद हा रिक्षाचालक होता आणि त्याचे 45 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. काही दिवस आनंद मुंबईला निघून गेला आणि त्यानंतर पुन्हा आला त्यावेळी महिला चिकलठाणा परिसरात राहत असल्याची माहिती त्याला समजली. तिथे पोहोचल्यानंतर महिलेने ‘ माझा नाद सोड माझा मुलगा आता मोठा झालेला आहे त्याला देखील ही बाब कळेल ‘ अशी विनंती केली मात्र आनंद ऐकत नव्हता.
अनेकदा सांगून देखील आनंद ऐकत नसल्याकारणाने महिलेने तिचा मुलगा आणि इतर तीन आरोपींनी 13 डिसेंबर रोजी आनंद याला विवस्त्र करून बेदम मारहाण केली आणि गंभीर जखमी अवस्थेत दुचाकीवर घेऊन जात साई टेकडी परिसरात फेकून दिले त्यात त्याचा मृत्यू झाला. संध्याकाळी वॉकिंगला गेलेल्या काही जणांना मृतदेह आढळल्यानंतर याप्रकरणी खुनाची नोंद एमआयडीसी सिडको पोलिसात करण्यात आली आणि त्यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली.