पुण्यात क्यूआर कोड स्कॅन करून लाच घेतली , अखेर कारवाई झाली

Spread the love

सरकार दरबारी कितीही प्रयत्न करण्यात येत असले तरी पोलीस दलातील भ्रष्टाचार काही कमी होण्याचे नाव घेत नाही . असाच एक प्रकार पुण्यात समोर आलेला असून दंड वसुलीच्या नावाखाली दुकानदारांच्या माध्यमातून वाहन चालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी एका पोलीस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे . शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संग्राम लक्ष्मण पवार असे आरोपी व्यक्तीचे नाव असून नळ स्टॉप चौकात चार डिसेंबर रोजी त्यांची नेमणूक होती. सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी एका दुचाकीस्वार महिलेला थांबवून दुचाकीची एनओसी मागितली आणि दहा हजार रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले. महिलेने दंड भरण्यास असमर्थता दर्शवली त्यावेळी त्याने एक हजार रुपये रोख देण्याची मागणी केली म्हणून महिलेने दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. 

तक्रारदार व्यक्ती यांना आरोपीने 500 रुपये मागितले आणि गुगल पे करते असे सांगितले मात्र गुगल पे करायचे असेल तर दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले म्हणून आरोपीने महिलेला न्यू इंद्रप्रस्थ मिनी मार्केट मधील एका दुकानात क्यूआर कोड स्कॅन कर आणि पाचशे रुपये रोख आणून दे असे म्हटले. 

महिला दुकानदाराकडे गेली आणि 520 रुपये फोन पे केले आणि पाचशे रुपये घेऊन पवार याला दिले . 4 डिसेंबर रोजी हा प्रकार घडलेला असून 11 डिसेंबर रोजी हा प्रकार उघडकीला आला . पोलीस उपायुक्त मगर यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत संग्राम पवार याला निलंबित केलेले आहे. वाहतूक पोलिसांकडे इ चलन मशीन मध्ये किंवा कोड स्कॅन करून दंड भरण्याची सुविधा आहे त्यामुळे खाजगी ठिकाणी जाऊन असे प्रकार करू नयेत असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेले आहे. 


Spread the love