महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून घाटकोपर पूर्व येथील रमाबाईनगर परिसरात नऊ आणि दहा डिसेंबर रोजी एका पतीने पत्नीला आर्थिक कारणासाठी चक्क मित्रांच्या ताब्यात सोपवले आणि दोन्ही नराधमांनी या महिलेवर अत्याचार केलेला आहे. महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत आरोपी पती याने पहिल्यांदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर स्वतःच्या पत्नीला मित्रांकडे सोपवले. पीडित महिलेचे वय 23 वर्ष असून मुळची ती सांगली येथील रहिवासी आहे . सांगलीत तिने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र गुन्हा मुंबईत घडला असल्याकारणाने गुन्हा घाटकोपर मधील पंतनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर कॉलनी परिसरात नऊ आणि दहा डिसेंबर रोजीची ही घटना असून पीडित महिलेच्या पतीने तिला एका शाळेच्या परिसरात आणले आणि त्यानंतर तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पतीसोबत पत्नीने हा प्रकार केला असल्याकारणाने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही मात्र त्यापुढे जे काही घडले ते कल्पनेच्या पलीकडले होते.
दहा डिसेंबर रोजी पीडित महिलेच्या पतीने तिला परिसरात नव्याने तयार होत असलेल्या एका इमारतीमध्ये आणले आणि दोन जणांची तिच्यासोबत ओळख करून दिली . दोन्ही जण हे आपले मित्र आहेत असे सांगत हे आपल्याला या बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळून देणार आहे त्याच्या बदल्यात आपल्याला देखील काहीतरी द्यावे लागेल असे म्हणत त्याने दोन्ही आरोपींना स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितले.
आरोपी पती सध्या पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत असून भाडे थकलेले आहे त्यामुळे भाडे भरण्यासाठी देखील पैशाची गरज होती म्हणून दोन्ही मित्रांकडून पाच पाच हजार रुपये घेतले आणि त्यानंतर स्वतःच्या पत्नीला त्यांच्या हवाली केले . पतीनेच पत्नीला आरोपींच्या तावडीत दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला असे महिलेचे म्हणणे आहे. सदर घटनेनंतर महिला सांगलीला निघून गेली होती मात्र त्यानंतर तिने तिथे जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र हा गुन्हा घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे. पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कवळे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.