महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या नागपूरमध्ये समोर आलेले असून शाळेत सुट्टीचा अर्ज घेऊन आलेल्या एका शिक्षिकेला शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी मुख्याध्यापक याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिले. शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पितांबर गायधने ( राहणार नरखेड ) असे आरोपी मुख्याध्यापक व्यक्तीचे नाव असून पितांबर हा एका नामांकित शाळेत मुख्यध्यापक पदावर कार्यरत आहे तक्रारदार महिला देखील याच शाळेत शिक्षिका पदावर कार्यरत असून आरोपी हा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता असे महिलेचे म्हणणे आहे.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे , आरोपीने तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केले आणि विनाकारण आपल्या कार्यालयात वारंवार तिला बसून ठेवायचा. आपल्या सोबत मैत्री ठेव असे देखील तो तिला म्हणायचा मात्र महिलेने त्याला नकार दिला. सुट्टी हवी आहे म्हणून महिला त्याच्या कार्यालयात दिली असता त्याने सुट्टी मंजूर करण्यापूर्वी शारीरिक संबंधाची मागणी केली आणि तिच्याकडे बघून अश्लील शेरेबाजी केली. रडत रडत महिलेने इतर शिक्षकांना हा प्रकार सांगितला आणि नरखेड पोलिसात आरोपी मुख्याध्यापक शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.