होय मरेपर्यंत जन्मठेप , नाशिक जिल्ह्यातील 2018 चे प्रकरण 

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नाशिक जिल्ह्यात 2018 मध्ये घडलेला होता. एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला पळवून त्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सोबतच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .त्रिंबकेश्वर तालुक्यातील बाफन विहीर येथील हे प्रकरण आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रमेश चंदर पागी ( वय 48 राहणार बाफन विहीर तालुका त्र्यंबकेश्वर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून एक मार्च 2018 रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली होती. आरोपीने अवघ्या 14 वर्षीय मुलीच्या घरात घुसून दमदाटी करत तिला पळवले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला . हरसुल पोलिसात या प्रकरणी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता

सहाय्यक पोलीस निरीक्षक पीपी साळुंखे यांनी तात्काळ आरोपीला अटक केली आणि त्यानंतर दोषारोपपत्र पुराव्यासोबत न्यायालयासमोर सादर केलेले होते.  जिल्हा व सत्र न्यायालय पोट क्रमांक एकच्या न्यायमूर्ती मृदुला भाटिया यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्षीपुरावाच्या आधारे आणि आरोपी यास  बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे


Spread the love