देशात एक खळबळजनक अशी घटना बिहारमध्ये पाटणा येथे समोर आलेली असून न्यायालयाच्या आवारात खटला सुरू असतानाच एका आरोपीची दोन जणांनी गोळी झाडून हत्या केली आहे . पोलिसांनी तात्काळ गोळ्या झाडणार्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अभिषेक कुमार उर्फ छोटे सरकार असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर खुनाचा खटला सुरू आहे . इतरही अनेक स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असून पाटणा जिल्ह्यातील दानापूर येथील न्यायालयात त्याला घेऊन जाण्यात आले होते त्यावेळी त्याच्यावर दोन जणांनी बेछूट गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केलेली असून न्यायालयाच्या परिसरातून चार गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत . आरोपी मुजफ्फरनगर येथील असल्याची माहिती आहे.