अल्पवयीन मुलीवर अत्याचार , पुन्हा एकदा ‘ जागेवरच फैसला ‘ 

Spread the love

देशात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून न्यायव्यवस्थेत गेल्यानंतर देखील अनेकदा काही प्रसंगात आरोपी निर्दोष सुटतात मात्र त्यामुळे न्यायव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.  उत्तर प्रदेश पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या पायावर गोळ्या घालत त्याला जखमी केलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नजीम असे मुख्य आरोपीचे नाव असून जकीर नावाचा आणखीन एक आरोपी या प्रकरणात सहभागी होता . गाजियाबाद मधील एक मुलगी रविवारी घराजवळून जात असताना दोन्ही आरोपींनी तिला कारमधून सोडण्याची ऑफर दिली आणि अवघ्या दहा वर्षाच्या मुलीवर त्यांनी कारमध्ये अत्याचार केला आणि त्यानंतर तिथून पळ काढलेला होता. 

मुलीच्या आईने त्यानंतर मंगळवारी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तात्काळ पोलिसांनी नजीम आणि जाकीर या दोघांनाही अटक केलेली होती. पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे नजीमला गुन्हा दाखल केलेल्या ठिकाणी घेऊन गेलो त्यावेळी त्याने तिथून कॉन्स्टेबलची पिस्तूल घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यबली मौर्य यांनी ही माहिती दिलेली आहे. 


Spread the love